आरोपी विश्रांती गांवसला पणजी जेएमएफसी कोर्टाने सुनावला ५ दिवसांचा रिमांड

विश्रांती गांवस सध्या आगशी पोलिस स्टेशनमध्ये; शुक्रवारी जीएमसीतून पळवलं होतं बाळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः जीएमसीतील एका महिन्याच्या बाळाच्या अपहरणाचा गुंता शनिवारी अखेर सुटला होता. पोलिसांनी सालेलीतून ताब्यात घेतलेल्या विश्रांती गांवस नामक महिलेनं अखेर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. शुक्रवारी दुपारी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून दिवसाढवळ्या एका महिन्याच्या अर्भकाचं अपहरण करणाऱ्या महिलेला शनिवारी पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, या अपहरण प्रकरणी आरोपी विश्रांती गांवस या महिलेला पणजीच्या JMFCने या 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. विश्रांती गांवस ही आरोपी महिला सध्या आगशी पोलिस स्टेशनमध्ये आहे. तिथे या महिलेची पोलिसांकडून कसून चौकशी केली जातेय.

हेही वाचाः ‘एनसीबी’ ची मोठी कारवाई ; हाय प्रोफाईल ड्रग्ज रॅकेटचं ‘बेकरी कनेक्शन’ उघड !

शुक्रवारी जीएमसीतून पळवलं होतं बाळ

शुक्रवारी दुपारी जीएमसीतून 1 महिन्याचं बाळ पळवण्याची घटना घडली होती. संशयित महिलेने शुक्रवारी दुपारी गोमेकॉ परिसरात मातेच्या हातातून अर्भकाला खेचून घेतलं असता मातेने आरडाओरडा सुरू केला. मात्र, त्या महिलेने अतिशय चलाखीने तिथून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध सुरू केला असता, ती मोटारसायकल पायलट करून पणजी बसस्थानकावर गेल्याची माहिती समोर आली.

हेही वाचाः कामुर्लीत जेटीला कधीच थारा देणार नाही

पोलिसांची शोध मोहीम

पुढे तपास केला असता ती महिला दुसऱ्यामोटारसायकल पायलटच्या मदतीने पर्वरीतील ‘तीन बिल्डींग’ या ठिकाणी गेल्याचं समजलं होतं. तिथून पुढे कांसा थिवी, अस्नोडा येथे गेल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी शोधा मोहीम सुरू केली होती. अखेर ती महिला सत्तरीत सापडलीये.

हेही वाचाः Euro Cup || क्रोएशिया आणि इंग्लंड आज भिडणार.!

शनिवारी संध्याकाळी सापडली

या प्रकरणी पीडित मातेच्या तक्रारीवरून उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रात्री उशीरापर्यंत तसंच शनिवारी पूर्ण दिवस म्हापसा तसंच डिचोली परिसरात संशयित महिलेचा शोध घेत होतं. अखेर शनिवारी संध्याकाळी पोलिसांच्या तपासाला यश आलं होतं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!