फक्त राजकारण्यांनीच नव्हे तर कोरोनानंही बदलले रंग !

एका संशोधनानुसार महाराष्ट्रात कोरोना विषाणूनं तब्बल 47 वेळा बदलले रंग

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोना महामारीच्या जीवघेण्या संकटात सामान्य जनतेचे प्राण वाचवण्यापेक्षा राजकारणाला प्राधान्य देणा-या नेतेमंडळींचे अनेक रंग आपल्याला पाहायला मिळताहेत. पण असे रंग बदलण्यात केवळ राजकारणीच नव्हे तर कोरोनाही आता सराईत झालाय. महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रात कोरोनानं तब्बल 47 वेळा रंग बदलल्याचं एका संशोधनात आढळून आलंय. मराठीत एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागला. जणु याचाच प्रत्यय आपल्याला यानिमित्तानं येत असावा.


पुणे इथलं नॅशनल इन्स्टिटयू आॅफ व्हायराॅलाॅजी, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद, आणि नवी दिल्ली इथलं नॅशनल सेंटर फाॅर डिसिज कंटोल या संस्थांनी एकत्रितपणे हा अभ्यास केला. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक प्रादूर्भाव असल्यामुळं प्रत्येक जिल्हयाचं स्वतंत्रपणे संशोधन करण्यात आलं. यासंदर्भात एनआयव्हीच्या डाॅ. प्रज्ञा यादव यांनी सांगितलं, गेल्या फेब्रुवारीपासून विषाणूच्या एस प्रोटीनमध्ये सर्वाधिक म्युटेशन पाहायला मिळालं. त्यामुळं प्रत्येक म्युटेशनवर सविस्तर संशोधन सुरू आहे.

यावर्षी दुस-या लाटेची सुरूवात जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातूनच झाली होती. या महिन्यात काही जिल्हयांमध्ये रूग्ण वाढू लागले होते. नोव्हेंबर 2020 ते मार्च 2021 पर्यंत 733 नमुने गोळा करून संशोधन करण्यात आलं. मात्र यातुन धक्कादायक निष्कर्ष समोर येत गेले. एकाच विषाणूत तब्बत 47 वेळा बदल म्हणजेच म्युटेशन दिसून आलंय. देशातला हा पहिला प्रकार होता. इटली, फ्रान्स, युके, अमेरीकेत थोडया फार प्रमाणात याचा अंदाज आला होता. 733 पैकी 598 नमुन्यांच्या तपासणीत असं आढळून आलं की डेल्टा व्हेरीएंटशिवाय यात आणखीही काही असे व्हेरीएंट आहेत जे ग्रामीण भागापर्यंत पोहोचलेत. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या शहरांत कोरोनाचे असे अनेक प्रकार आढळून आल्याचंही समोर येतंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!