अपघात वाढले, पण मृत्यू होण्याचं प्रमाण घटलं!

मासिक अहवालातून महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक विभागाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२१ या 7 महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.९३ टक्के म्हणजे १५२ अपघात वाढले. तर अपघाती मृत्यूत १०.६८ टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षीयपेक्षा १४ मृत्यू कमी झाल्याचं आकडेवारीतून समोर आलंय. यंदा या कालावधीत ७०.९४ टक्के ८३ दुचाकी चालक आणि मागे बसलेल्यांचे मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक पोलिस विभागाच्या मासिक अहवालातून समोर आली आहे.

गेल्यावर्षीपेक्षा अपघाती मृत्यू घटले

राज्यात यंदा सात महिन्यात ११४ अपघातात एक किंवा जास्त जणांचा मुत्यू झालाय. त्यापैकी ७७ गंभीर अपघात, २२२ किरकोळ अपघात तर १,११७ अपघातात फक्त वाहनाचे नुकसान झालंय. तसेच वरील कालावधीच्या २०२० मध्ये १२६ अपघातात एक किंवा जास्त व्यक्तीचा मुत्यू झाला होता. तर ८३ गंभीर अपघात, २६० किरकोळ अपघात तर ९०९ अपघातात फक्त वाहनाचे नुकसान झाले होतं.

हेही वाचा – रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाचा फटका! कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ ४ गाड्या रद्द

नेमकी आकडेवारी

राज्यात यंदा २०२१ मध्ये १,५३० अपघात झालेत. यात ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २०२० मध्ये १,३७८ अपघातात १३१ जणांचा मृत्यू झाला होता. यंदा २०२० मध्ये सर्वाधिक मृत्यू ७१ दुचाकी चालकांचा झाले आहेत. तर त्यानंतर १५ पादचारी, १२ दुचाकीच्या मागे बसलेले, १० चालक, ५ प्रवासी, ३ सायकलस्वार आणि एक इतरांचा समावेश आहेत. या व्यतिरिक्त ९३ जण गंभीर तर ३५२ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर वरील कालावधीत २०२० मध्ये ८१ दुचाकीचालक, २२ पादचारी, १० दुचाकीच्या मागे बसलेले, ०९ चालक, ४ प्रवाशी, एक सायकलस्वार तर ४ इतरांचा मृत्यू झाले होते. तर १२१ जण गंभीर तर ४०० जणांना किरकोळ दुखापत झाली होती.

चिंता कायम

राज्यात होणारे अपघाती मृत्यू ही दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनला आहे. असं असताना दुचाकी चालक हेल्मेट न परिधान केल्यामुळे तसेच वाहन चालक निष्काळजी आणि बेफिकीरने वाहन चालविल्यामुळे अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राज्यात अनेक उपक्रम राबवले आहे.

राज्यातील अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी पोलिस खात्याने वाहतूक पहारेकरी (ट्रॅफिक सेंटिनल) ही विशेष गुण पद्धत योजना १० नोव्हेंबर २०१७ पासून सुरू केलेली होती. ती योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे याचा प्रभाव काही प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

car-accident-generic-unsplash-650_625x300_24_January_19

या व्यतिरिक्त शाळा, विद्यालयात, महाविद्यालयात तसेच इतर शैक्षणिक संस्थात अपघात तसेच वाहतूक उल्लंघन नियमासह रस्ता सुरक्षेवर जागृती करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यामुळे पालकांवर कारवाई केली जात आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!