गोव्याला येणाऱ्या मालाची अशी झाली ‘अपघाती लूट’

संदिप देसाई | प्रतिनिधी
दोडामार्ग : दोडामार्ग – गोवा राज्य मार्गावर पेट्रोल पंपनजीक डंपर व एका मॉलचे कॉस्टमेटीक सामान घेऊन जाणाऱ्या आयशर टेमोत भीषण अपघात झाला. या अपघातात डंपरची धडक बसून टेम्पोचा एका बाजूने भाग कापला गेला. त्यामुळं आत भरलेला लाखो रुपये किंमतीचा माल सौंदर्य प्रसाधने, गुडनाईट मच्छर कॉईल व इतर सामान रस्त्यावर पडले. अंधार पडायच्या वेळी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्यानं अनेकांनी रस्त्यावर पडलेला माल लंपास केला.
या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी डंपर मधिल एक जण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. अपघाताचे वृत समजताच गोवा, दोडामार्गचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मुंबई इथून एका मॉलचा लाखो रुपये किंमतीचा माल भरून जी ए ०४ टी ५२८९ हा आयशर टेम्पो दोडामार्ग येथून गोवा येथे जात असताना पेट्रोल पंपानजीक डंपर केए २२ बी ६९५९ ची जोरदार धडक बसली. यात डंपर चालक जखमी झाला. अपघात होताच आयशर टेम्पोतील लाखो रुपये किंमतीचे कॉस्मेटिक सामान मात्र रस्त्यावर पडले. काही ग्रामस्थांनी हीच संधी साधत हे साहित्य हातोहात लांबवले.