ACCIDENT | भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

उसगाव फोंडा येथे अपघात; मुसळधार पावसात रस्त्यावरील खांबाचा अंदाज न आल्यानं अपघात घडल्याची शंका

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः बातमी आहे राज्यातील अपघातांची… जसजसा पावसाचा जोर वाढतोय, राज्यातील अपघातांचं सत्र वाढायला सुरुवात झालीये. मागील काही दिवस पावसाने राज्यात जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलंय. त्याचबरोबर रस्तेही निसरडे झालेत. त्यामुळे अपघातांच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसते. बुधवारी सकाळीच फोंडा भागात एका बाईकचा स्वयंअपघात होऊन तरुण दगावण्याची घटना घडलीये. त्यामुळे फोंडा परिसरातून हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेनंतर राज्यातील अपघातांचं सुरु असलेलं सत्र जीवघेणं ठरत असल्याचं अधोरेखित होतंय.

कसा झाला अपघात?

बुधवारी पहाटे हा अपघात घडला. GA 05 O 0420 या नंबरच्या बुलेटचा भीषण अपघात झाला. दुचाकीस्वार 30 वर्षीय तरुण या अपघातात जागीच दगावलाय. हा अपघात नेमका कसा घडला हे कळू शकलं नाहीये.

30 वर्षीय युवकाचा मृत्यू

उत्तम धामी या 30 वर्षीय तरुणाचा या अपघातात मृत्यू झालाय. अपघातातील मृत तरुण हा तिस्क उसगावमधील सिद्धेश्वर नगरमध्ये राहायला होता, अशी माहिती समोर आली आहे. पहाटे वेर्णा येथील कंपनीत कामावर जाताना सकाळी 5.30 च्या सुमारास धातवाडा फोंडा या ठिकाणी हा अपघात घडलाय. एका बाजुने मुसळधार पावसात रस्त्यावरील खांबाचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर दुसऱ्या बाजुने कुत्रा किंवा गुरं रस्त्याच्या मधे आल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता बोलून दाखवली जातेय. मात्र अजून अधिकृत कारण समोर आलेलं नाहीये. फोंडा पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

एमआरएफ उसगावजवळ अपघात

दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की यात बुलेटची हेडलाईटच वेगळी झालेय रस्त्याच्या मधोमध बुलेटची हेडलाईट पडल्याचं दिसून आलंय. त्यावरुन या अपघाताची तीव्रता किती होती, याची कल्पना केलेली बरी. दरम्यान, 30 वर्षीय उत्तमच्या अपघाती मृत्यूमुळे धामी कुटुंबियांवरही शोककळा पसरली आहे. एकूण राज्यातील रस्ते अपघात काही केल्या थांबायचं नाव घेतल नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. एमआरएफ उसगाव जवळ हा अपघात घडला. पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर येतेय.

हा व्हिडिओ पहाः POLITICS| LOBO- पुन्हा एकदा मायकल लोबो राजकीय कृतीमुळे चर्चेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!