Accident | अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू…

तिस्क उसगाव येथील घटना; पोलीस तपास सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : राज्यात अपघातांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. २०२२ मध्ये आतापर्यंत एकूण अपघात १,८२४ झाले आहेत. २०२१ मध्ये ही संख्या १,५१९ एवढी होती. अपघाताच्या संख्येत ३०५ ने वाढ झालेली आहे. याशिवाय ज्या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला अशा अपघातांची संख्या यावर्षी १३३ आहे, जी गेल्यावर्षी १०९ होती. यात २४ ने वाढ झालेली आहे. तसेच १३३ अपघातात यंदा १४३ जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्यावर्षी १०९ अपघातात ११२ जणांचा मृत्यू झाला होता. गोव्यात आजचा शुक्रवार अपघातवार ठरल्याचं दिसत आहे.
हेही वाचा:तब्बल १८ दिवसांनी सापडला पर्यटकाचा मृतदेह…

अपघातात महिलेला जीव गमावावा लागला

शुक्रवारी भल्या पहाटे तिस्क उसगाव येथील नेस्ले कंपनीजवळ एक अपघात घडला आहे. या अपघातात एका महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. या अपघातानंतर फोंडा पोलिसांनी पंचनामा केला असून तपासही सुरु केला आहे.
हेही वाचा:Accident | कदंब बसच्या धडकेत सायकलस्वाराचा बळी…

कामानिमित्त तिस्क येथे भाड्याने राहत होती

नेस्ले कंपनीजवळ आज शुक्रवारी अज्ञात वाहनाने एका महिलेला धडक दिली. या धडकेत महिलेला आपला जीव गमावावा लागला आहे. अनघा आनंद देसाई असे या 44 वर्षीय महिलेचे नाव असून मृत महिला कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही महिला सध्या तिस्क येथे कामानिमित्त भाड्याने राहत होती.
हेही वाचा:एनआयएचे १३ राज्यांत छापे; पीएफआयच्या १०६ सदस्यांना अटक…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!