उसगांव वडाकडे भीषण अपघात, दोघांना मरण

या भीषण अपघातात मरण आलेले दोघेजण राहाणारे पाळी साखळीचे आहेत.

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा: उसगांव वडाकडे बुधवारी झालेल्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झालेत. मागून येणाऱ्या चारचाकीने स्कुटरला धडक दिली. हीट एण्ड रनची केस. फोंडा पोलीस चारचाकीचा शोध घेत आहेत.

मरण आलेले 21 वर्षीय अलिशा फर्नांडीस आणि 20 वर्षीय चंद्रकांत दाही दोघेही राहणारे पाळीचे. रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकच्या बाजूने गाडी काढताना मागून येणाऱ्या चार चाकीने स्कुटरला धडक दिली. धडक देऊन चारचाकी चालक फरार झालाय.

उसगांव वडाकडे भीषण अपघात
हिट एण्ड रन एक्सिडंट केस
स्कुटरवरील दोघांना जागीच मरण
पोलीस चारचाकीच्या शोधात आहेत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.