ACCIDENT | शिवोली पुलावर जीपच्या धडकेत दोन गुरं ठार

सोमवारी मध्यरात्रीची घटना; तीन गुरं जखमी; जीप चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंद

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: शिवोली येथे पुलावर  रशीयन नागरिकाने गुरांवर जीप चढवल्याने दोन गुरं ठार झाली, तर तीन गुरं जखमी झालीत. हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.

हेही वाचाः ACCIDENT | अज्ञात वाहनाने ठोकरल्याने युवकाचा मृत्यू

जीपची गुरांना जोरदार धडक

येगोर प्रीवालोन हा मोरजी येथे राहणारा रशियन नागरिक जी ए ०८ ए ०८१५ क्रमांकाच्या टाटा सफारी या जीप गाडीने चालला होता. वाटेत शिवोली पुलावर गुरांचा कळप बसला होता. भरधाव वेगाने जाणाऱ्या जीप चालकाला तो गुरांचा कळप दिसला नाही.  त्यामुळे या कळपाला जीपची जोरदार धडक बसली. पाच गुरं या अपघाताची शिकार झाली ज्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचाः ACCIDENT | कुडचडेत अपघात; एकजण जखमी

पोलिसांकडून अपघाताचा गुन्हा नोंद

अपघाताची माहिती मिळताच हणजूण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. तसंच मृत आणि जखमी झालेल्या गुरांना  पुलावरून बाजूला काढलं. या प्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!