ACCIDENT | धारगळ जंक्शनवर ट्रक – दुचाकीचा अपघात

सुदैवाने दुचाकीस्वार बचावला; धारगळला उड्डाणपुलाची गरज

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे: राज्यात अपघाताची प्रकरण सुरूच आहेत. पावसात सगळीकडे पाणीच पाणी झाल्याने, त्यात रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे अपघाताचे प्रकार वाढत चाललेत. खराब रस्ते आणि पाऊस यामुळे उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात पत्रादेवी ते धारगळ महामार्गावर अपघातांची प्रकरण वाढतच आहेत. 

हेही वाचाः Tokyo Olympic 2021 : ‘चक दे इंडिया’; 41 वर्षानंतर हॉकीमध्ये पदक

कुणाचा अपघात?

धारगळ जंक्शनवर बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पणजीकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक आणि दुचाकी एकाचवेळी ओव्हरटेक करताना अपघात झाला. या अपघातात दुचाकी ट्रकखाली सापडली. मात्र दुचाकी चालकाने प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तो बचावला. या अपघाताने धारगळ येथील उड्डाणपूलाची गरज अधोरेखित झाली आहे.

कसा झाला अपघात?

धारगळ जंक्शनवर ट्रक पणजीच्या दिशेने येत होता. तेथूनच दुचाकी घेऊन एक नागरिक रस्ता ओलांडत होता. मात्र, ट्रक जवळ आल्याचा अंदाज दुचाकी चालकास आला नाही. त्यामुळे दुचाकी ट्रकखाली सापडली. चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारली. धारगळ येथे उड्डाण पूल नसल्यामुळे वारंवार येथे असे अपघात वारंवार घडत आहेत.

हेही वाचाः Tokyo Olympics 2021 : फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं!

पत्रादेवी ते धारगळपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग धोकादायक

तालुक्यातील पत्रादेवी ते धारगळपर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग पावसाळ्यात अत्यंत धोकादायक बनला आहे. एका बाजूने सर्व्हिस रस्त्याचे तीन तेरा वाजलेत, तर काही ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचा पत्ताच नाही. सार्वजनीक  बांधकाम खात्याचे महामार्गाचं काम पाहणारे अधिकारी किती जागृक आहेत, हे या रस्त्यावर लक्ष मारल्यावर दिसून येतं.

मात्र अजूनही उपाय-योजना नाहीत

आतापर्यंत या धोकादायक रस्त्याची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊस्कर यांनी भेट देऊन पाहणी केली. मात्र आजपर्यंत कंत्राटदराने कोणत्याच उपाय योजना केलेल्या दिसत नाहीत. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला ज्या ठिकाणी सर्व्हिस रस्ते आहेत, त्याला किती खड्डे पडलेत याची जाणीव अजून सरकारला नाही. काही ठिकाणी सर्व्हिस रस्ते करण्यासाठी सरकारने अजून जागाच संपादित केलेली नाही. 

हा व्हिडिओ पहाः Video | TAXI | DIGITAL METER | टॅक्सींच्या भाड्यात वाढ, मात्र डिजिटल मीटरसाठी आग्रह

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!