ACCIDENT | कामुर्लीत कार घुसली झुडपात

कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: बातमी आहे राज्यातील अपघातांची…राज्यात अपघातांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. शुक्रवारी कामुर्ली येथे एक स्वयंअपघात झालाय.

नक्की कसा झाला अपघात?

शुक्रवारी सकाळी म्हापशातील कामुर्ली येथे असलेल्या वाघबिळ कुंभार खण वळणावर एक मोठा अपघात झाल्याचं समजतंय. जीए ओ ३ डब्ल्यू ५१६६ या क्रमांकाच्या कारचा अपघात झाल्याची माहिती हाती येतेय. वळण मोठं असल्याने चालकाला त्याचा अंदाज आला नाही आणि हा अपघात घडला असल्याचं बोललं जातंय. ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटल्यानं कार रस्ता सोडून बाजूच्या झुडपात घुसल्याची माहिती मिळतेय.

सुदैवाने जिवीतहानी टळली

तसं पाहता अपघात भीषण होता. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचं समजतंय. मात्र या अपघातात चालकाला कितपत दुखापत झालीये याविषयी अद्याप कोणतीच माहिती हाती आलेली नाही.

राज्यात अपघातांचं सत्र सुरूच

रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

हा व्हिडिओ पहाः Coal Transport | RG | मागे नंबर प्लेट नसलेला ट्रक कोळसा उधळत निघाला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!