राज्यातील अपघातांबाबतची ही आकडेवारी पाहिलीत का?

अपघात आणि अपघाती मृत्यूबाबत महत्त्वाची आकडेवारीa

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात अपघाती मृत्यू टाळण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी वाहतूक विभाग, पोलिस आणि वाहतूक खात्याने विविध उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे राज्यात २०२० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०.९६ टक्के म्हणजे १,०६५ अपघात कमी झाले आहेत. तर अपघाती मृत्यूत २४.९२ टक्के म्हणजे ७४ मृत्यू कमी झाले आहेत. २०२० मध्ये राज्यात ७५.३३ टक्के १६८ दुचाकी चालक आणि मागे बसल्यांचे मृत्यू झाले आहेत. पायी चालणेही धोकादायक बनले आहे, असे वाहतूक खात्याच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

गेल्या वर्षीपेक्षा कमी अपघात आणि मृत्यू

राज्यात २०२० मध्ये २,३७५ अपघात झाले असून २२३ जणांचा मृत्यू झाला आहे. २०१९ मध्ये ३,४४० अपघातांत २९७ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे राज्यात अपघातात ३०.९६ टक्के, तर मृत्यूत २४.९२ टक्के घट झाली आहे. २०१९ च्या तुलनेत दुचकीचालकांच्या मृत्यूत २२.२८ टक्के, दुचाकीवर मागे बसलेल्यांच्या मृत्यूत १६.६७ टक्के, पादचाऱ्यांच्या मृत्यूत ४०.८२ टक्के, प्रवाशांच्या मृत्यूत ७३.६८ टक्के घट झाली आहे. इतर वाहन चालकांच्या मृत्यूत २० टक्के आणि इतरांच्या मृत्यूत १३३.३३ टक्के वाढ झाली आहे.

काळजी आणि चिंता कायम

राज्यात होणारे अपघाती मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. असे असताना दुचाकी चालक हेल्मेट परिधान न केल्यामुळे, तसेच निष्काळजी आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळे अपघात होत आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राज्यात अनेक उपक्रम राबवले आहेत. अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करून वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी पोलिस खात्याने वाहतूक पहारेकरी (ट्रॅफिक सेंटिनल) ही विशेष गुण पद्धत योजना १० नोव्हेंबर २०१७ पासून सुरू केली होती. ती नुकतीच बंद करण्यात आली आहे. याचा भविष्यात काही प्रमाणात प्रभाव पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच शाळा, महाविद्यालयांत अपघात तसेच वाहतूक उल्लंघन नियमासह रस्ता सुरक्षेवर जागृती करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यामुळे पालकांवर कारवाई केली जात आहे.

२०२० मध्ये १४३ दुचाकी चालकांचा मृत्यू

२०२० मध्ये १४३ दुचाकी चालकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर २९ पादचारी, २५ दुचाकीवर मागे बसलेले, १२ चालक, ५ प्रवासी, दोन सायकलस्वार आणि इतर सात जणांचा समावेश आहे. २०२ जण गंभीर तर ६७८ जणांना किरकोळ दुखापत झाली होती. २०१९ मध्ये १८४ दुचाकीचालक, ४९ पादचारी, ३० दुचाकीवर मागे बसलेले, १९ प्रवासी, २ सायकलस्वार तर इतर तिघांचा मृत्यू झाला होता. २६५ जण गंभीर तर १,१८३ जणांना किरकोळ दुखापत झाली होती.

हेही वाचा –

धुक्याचा कहर! भीषण अपघात, 13 जणांवर काळाचा घाला

धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा मैत्रिणींचे मृतदेह….

….शॉर्टकटने गेले नसते तर कदाचित अपघात टळला असता!

धारबांदोड्यात कार झाडावर आदळली, दोघांवर काळाचा घाला

भीषण! फूटपाथवर झोपलेल्या ‘त्यांना’ ट्रकने चिरडलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!