ACCIDENT | रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

वेर्णा ते करमळी दरम्यान रेल्वे मार्गावर अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगावः राज्यात रस्ते अपघातांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. रोज एखाद दुसरा अपघात झाल्याच्या बातम्या कानावर येतात. त्यातच रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीला तिचे प्राण गमवावे लागलेत.

वेर्णा ते करमळी दरम्यान रेल्वे मार्गावरची घटना

रेल्वेच्या धडकेने एक अनोळखी व्यक्ती ठार झाल्याची घटना घडलीये. वेर्णा ते करमळी दरम्यान रेल्वे मार्गावरही ही घटना घडल्याचं समजतंय. ती व्यक्ती रेल्वे मार्गावर काय करत होती याचं कारण समजलेलं नाही. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

४५ ते ५० वयोगटातील व्यक्तीचा मृत्यू

मयत अंदाजे ४५ ते ५० वयोगटातील असल्याचं समजतंय. मयताच्या डोक्याला इजा झालीये. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतलंय. मृतदेह गोमेकांच्या शवागारात ठेवलाय. कोकण रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरू कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माधवी देसाई पुढील तपास करतायत.

हेही वाचाः ACCIDENT ! धावत्या रेल्वेवर आदळला ट्रक

आयुष्य धोक्यात टाकू नका

बऱ्याचदा शॉर्टकट म्हणून काहीजण रेल्वे रुळ ओलांडून जातात. असे प्रकार जीवावर बेतू शकतात. रेल्वे रूळ ओलांडून जाणं कधीही धोकादायक. त्यामुळे रेल्वे रूळ कधीच ओलांडू नका. आपलं आयुष्य धोक्यात टाकू नका. प्रवाशांनी कधीच रेल्वे ट्रॅकचा वापर करू नये. पादचारी पुलांचा वापर करावा, आपला प्रवास सुरक्षित करावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!