ACCIDENT | रेल्वेच्या धडकेत एक ठार

माजोर्डा येथील घटना; ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्यात रस्ते अपघातांच्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. रोज एखाद दुसरा अपघात झाल्याच्या बातम्या कानावर येतात. त्यातच रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीये. रेल्वेची धडक बसून एकाला त्याचे प्राण गमवावे लागलेत. ही एक दुर्देवी घटना आहे. हा अपघात माजोर्डा येथील रेल्वे रुळावर घडल्याची माहिती समोर येतेय.

हे वाचाः कामाच्या आधारे कार्यकर्ता ते मोठं पद ही वाटचाल केवळ भाजपातच शक्य

कुणाचा अपघात?

माजोर्डा येथे रेल्वेच्या धडकेने एका ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हिलरी गाब्रियल डिसोझा (रा. दुकोळी – सुरावली) असं मयताचं नाव आहे. अनैसर्गिक मृत्यू म्हणून कोकण रेल्वे पोलिसांनी हे प्रकरण नोंदवून घेतलं आहे. मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हिरु केवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नाईक पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचाः ‘भारतमाता की जय’ संघातर्फे सत्तरीतील पूरग्रस्त भागात मदत कार्याला सुरुवात

आयुष्य धोक्यात घालू नका

बऱ्याचदा शॉर्टकट म्हणून काहीजण रेल्वे रुळ ओलांडून जातात. असे प्रकार जीवावर बेतू शकतात. रेल्वे रूळ ओलांडून जाणं कधीही धोकादायक. त्यामुळे रेल्वे रूळ कधीच ओलांडू नका. आपलं आयुष्य धोक्यात टाकू नका. प्रवाशांनी कधीच रेल्वे ट्रॅकचा वापर करू नये. पादचारी पुलांचा वापर करावा, आपला प्रवास सुरक्षित करावा.

हेही वाचाः गणपती बाप्पावरुन आक्षेपार्ह टिप्पणी करणं महागात पडलं! म्हापसा पोलिसांची कारवाई

हा व्हिडिओ पहाः Video | FLOOD | पूरजन्य परिस्थितीला मानवनिर्मित कारणेही जबाबदार- राजेंद्र केरकर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!