ACCIDENT | कोरकरणवाडा तलावात बुडून एकाचा मृत्यू

केरळातील युवकाचा मृत्यू; महिन्याभरापासून मित्रांसह राहत होता हरमलात

Goan Varta Live | प्रतिनिधी

हरमल: येथील कोरकणवाडा धरण तलावात मित्रांसह आंघोळीसाठी उतरलेल्या केरळ येथील आशिष डेरी (२३) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. हा युवक मित्रांसह महिनाभरापासून हरमलात राहत होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला.

हेही वाचाः प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर

पण पर्यटक त्याचं पालन करत नाहीत

दरम्यान, हा तलाव श्री राष्ट्रोळी देवाचा असल्याने येथील पावित्र्य राखावं, कोणीही आंघोळीसाठी पाण्यात उतरू नये, असा फलक लावण्यात आला आहे. पण, पर्यटक अथवा परप्रांतीय त्याचं पालन करत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

हेही वाचाः ACCIDENT | धारबांदोड्यात महाराष्ट्र-गोवा टक्कर; एकजण जखमी

पोलिसांनी केला पंचनामा

सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे,  रविवार सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चार जणांचा गट पाण्यात उतरला होता. मात्र अर्धा – एक तासाने त्या गटातील एकजण पाण्यात नाहीसा झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या मित्राने धावत येऊन स्थानिक हॉटेल मालकाला त्याची कल्पना दिली. ते दोघे तलावाकडे येत असतानाच अन्य दोघांनी त्याला बाहेर काढून दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. इतक्यात १०८ रुग्णवाहिका तिथे पोहोचली. पेडणे पोलीस उपनिरीक्षक संदीप कांदोळकर यांनाही याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर आऊट पोस्टचे तपास अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!