ACCIDENT | म्हारांगण येथे महामार्गावर अपघात

बैल ठार; गाडीचा चक्काचूर; बेवारशी गुरांमुळे अपघाताच्या प्रकरणांमध्ये वाढ

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोण: गेला आठवडाभर कोसळणारा संततधार पाऊस, राज्यातील खराब रस्ते यामुळे अपघातांच्या प्रकरणांमध्ये वाढ झालेली पहायला मिळतेय. या अपघातात होणाऱ्यी मृत्यूची संख्याही वाढतेय. माणसांसोबत मुक्या प्राण्यांचादेखील नाहक बळी जातोय. शनिवारी पहाटे दक्षिण गोव्यातील काणकोण तालुक्यात येणाऱ्या म्हारांगण या ठिकाणी असाच एक अपघात झालाय. या अपघातात एका मुक्या प्राण्याला आपला जीव गमवावा लागलाय.

कसा झाला अपघात?

शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास काणकोण तालुक्यातील म्हारांगण येथे मोठा अपघात झाला. काणकोणहून कारवारच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने बैलाला ठोकलंय. एच.आर.१७ ऐ.१७८८ या क्रमांकाच्या ब्रिझा कारची बैलाला जोराचा धडक बसल्याने या बेवारशी बैलाचा मृत्यू झालाय. तसंच बैलाला ठोकल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वीजेच्या खांबाला कारची धडक बसल्याने हा वीजेचा खांबही वाकलाय.

पोलिसांनी केला अपघाताचा पंचनामा

या अपघातात कारमध्ये असलेल्या माणसांना कोणतीच इजा पोहोचलेली नाही, असं काणकोण पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अपघाताची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अपघाताचा पंचनामा केला.

बेवारशी गुरांमुळे अपघाताच्या प्रकरणांमध्ये वाढ

बेवारस गुरांमुळे या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. यापूर्वी भगतवाडा, चाररस्ता येथेही बेवारशी गुरांमुळे महामार्गावरून धावणाऱ्या गाड्यांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Inside Story | Amar Naik | पोलिसांच्या तपासाला यश, पण आव्हान कायम!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!