ओव्हरटेकिंगच्या नादात दुचाकीचा अपघात! जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरु

अति घाई संकटात नेई

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा : अति घाई, संकटात नेई, असे बोर्ड हायवेवर लावलेले तुम्ही अनेकदा वाचले असतील. पण त्याचं आचरण काही केल्या लोकांकडून होताना अजूनतरी दिसलेले नाहीत. ओव्हरटेकिंगच्या नादात एक अपघात झाला असून यात चालक जखमी झालाय.

हेही वाचा : ओल्ड गोवा बायपासरोडवर भीषण अपघात, अंगावर काटा आणणारे Photo समोर

कुठे झाला अपघात?

मंगळवारी दुपारी कोने-प्रियोळ इथं बाईकचा अपघात झाला. या अपघातात प्रियोळमधील सुभाष विष्णू सतरकर हे गंभीर जखमी झाले. या अपघाताची भीषणता किती होती, याची कल्पना फोटोतून कळू शकेल. दरम्यान, एका वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात असताना सुभाष विष्णू सतरकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि हा अपघात घडला, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.

हेही वाचा : CCTV VIDEO | चेकपोस्टवर काळजाचा ठोका चुकवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर जखमी सुभाष विष्णू सतरकर यांनी तात्काऱ उपचासाठी आधी फोंडा उपजिल्हा रुग्णालयात पोलिसांच्याच वाहनातून आणण्यात आलं. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सुभाष यांना जीएमसीमध्ये उपचारासाठी दाखल केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. फोंड्याचे पोलिस निरीक्षक मोहन गावडे यांनी या अपघाताबद्दलची माहिती दिली असून या अपघाताचा पुढील तपास सुरु आहे. एकूणच राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.

हेही वाचा : ACCIDENT | बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात; 16 प्रवासी जखमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!