Accident : इन्सुलीत कदंबा बसची एसटीला धडक बसून अपघात…

कदंबा बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात

रजत सावंत | प्रतिनिधी

सावंतवाडी : कदंबा आणि एसटी बस यांची समोरासमोर धडक बसून अपघात झाला आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेतीन वाजण्याच्या सुमारास इन्सुली-कालवा परिसरात घडली. कदंबा बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
हेही वाचाःAccident | ट्रॅक्टर तलावात उलटून झालेल्या अपघातात आठ महिलांसह दोन मुलांचा मृत्यू …

दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्या

दरम्यान, अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहनधारकांसह ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त कदंबा सावंतवाडी येथून पणजीच्या दिशेने जात होती. तर एसटी बस गोवा येथून देवगडला जाण्यासाठी निघाली होती. यावेळी इन्सुली येथे हा अपघात घडला. सुदैवाने दोन्ही बसमधील प्रवासी सुखरूप आहेत. मात्र अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या मधोमध अडकल्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे.
हेही वाचाःरशियातील शाळेत गोळीबार; १३ जणांचा जागीच मृत्यू…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!