मागून ठोकलं! पत्रादेवी बांदा दरम्यान ट्रेलरची डंपरला धडक

अपघातात दोन्ही गाड्यांचं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : रस्ते अपघातांची मालिका बुधवारपासून जी सुरु झाली आहे, ती काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. बांद्यानजीक भीषण अपघात झाला आहे. एका ट्रेलरला डंपर मागून धडक दिली आहे. या अपघातात दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. झाराप पत्रादेवी महामार्गावर इन्सुली आरटीओच्या जवळ हा अपघात घडला. अपघातात डंपरच्या पुढच्या भागाचं मोठं नुकसान झालं आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

हेही वाचा – दोडामार्गजवळ गोवा नंबर प्लेटच्या सॅन्ट्रो कारचा अपघात, पण…

कुठे आणि कसा झाला अपघात?

मुंबईहून गोव्याच्या दिशेने एक ट्रक औषधं घेऊन निघाला होता. एमएच ०४ जेयू ६९३८ असा या ट्रकचा नंबर आहे. हा ट्रक इन्सुली आरटीओ ऑफिसच्या समोर थांबण्यासाठी हळूहळू ब्रेक लावत होता. तोच मागून भरधाव वेगात येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरनं या ट्रकला मागून ठोकलं. एमएच ०७ सी ६९४२ नंबरच्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा समोरचा भाग या पार चेपलाय.

हेही वाचा – पेट्रोल पंपासमोरच कंटेनर उलटला! दैव बलवत्तर म्हणून ड्रायव्हर आश्चर्यकारकरीत्या बचावला

या अपघातात दोन्ही गाड्यांचं नुकसान झालं आहे. औषधांनी भरलेला ट्रक गोव्यातील म्हापसाच्या दिशेने येत होता. या अपघाताची भीषणता प्रचंड होती. सुदैवानं या अपघातात डंपरचालक थोडक्यात बचावलाय. आश्चर्यकारकरीत्या दोन्ही ट्रकमधील बचावलेत. नवल म्हणजे या अपघाताची नोंद बांदा पोलिस ठाण्यात करण्यात आली नसल्याचीही माहिती ब्रेकींग मालवणी या वेबसाईटनं दिली आहे.

हेही वाचा – पणजीनंतर आणखी एका ठिकाणी मद्यधुंद चालकाचा कहर, 8 जणांना चिरडलं, चौघांचा जागीच मृत्यू

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!