थरार! कार चढवली स्कुटरवर…

पणजीतील मेरी इम्यॅक्युलेट चर्चजवळ विचित्र अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : नव्याकोर्‍या कारनं स्कुटरला धडक दिली. हा अपघात पणजीतल्या मेरी इम्यॅक्युलेट चर्चजवळ घडला. नो एंट्रीत कार घुसवण्याच्या नादात चालकाचा कारवरचा ताबा सुटला आणि त्यानं कार पार्क केलेल्या स्कुटरवर चढवली. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालं नाही.

‘वन वे’त जाताना अपघात

सोमवारी दुपारी हा अपघात घडला. मेरी इम्यॅक्युलेट चर्चजवळच्या प्रोग्रेस हायस्कूलजवळून एक वन वे जातो. पणजी कोर्टासमोरून चर्च स्क्वेअरमार्गे आल्तिनो, मळा, पणजी शहर आदी भागात जाण्यासाठी हा एकेरी रस्ता आहे. मात्र अनेकदा बाहेरून आलेले पर्यटक या रस्त्यानं चुकीच्या बाजूनं वाहनं घुसवतात. असाच प्रकार सोमवारी दुपारी घडला. नव्याकोर्‍या मारुती सुझुकी एस प्रेसो कार चालवणार्‍या चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट दुचाकी पार्किंगच्या बाजूला झेपावली.

ROBBERY | ग्राहक बनून आले अन् मंगळसूत्र हिसकावून पळाले

सुदैवानंच टळली जीवितहानी

या रस्त्यालगत भाड्यानं दिली जाणारी पिवळ्या नंबर प्लेटची अ‍ॅक्टिवा स्कुटर पार्क केली होती. त्यावर कार चढली आणि बंद पडली. त्यानंतर कारचालक बाहेर आला. सुदैवानं स्कुटरवर कोणीही बसला नव्हता. त्या ठिकाणी कोणी पादचारीही नव्हता. त्यामुळे अपघातात कोणाला इजा झाली नाही.

मागून ठोकलं! पत्रादेवी बांदा दरम्यान ट्रेलरची डंपरला धडक

अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम

हा अपघात घडल्यानंतर काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. लक्ष्मण राघा असं कारच्या मालकाचं नाव आहे. स्कुटरवर चढलेली कार पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी जमली होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!