Accident | नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रकचा अपघात

रस्त्याबाहेरील झाडाला दिली धडक ; लोटली वेर्णा येथील घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

वेर्णा : लोटली वेर्णा रस्त्यावर शुक्रवारी मालवाहू ट्रकचा अपघात झाला. ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं ट्रकने रस्त्याबाहेरील झाडाला धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचाःकांदोळी समुद्रकिनारी दोन शॅक रेस्टॉरंट्सना आग

सुदैवाने जीवितहानी नाही

राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. दुचाकी, चारचाकी यांच्यासोबतच ट्रक, बसेस अशा मोठ्या गाड्यांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होतायत. याबाबत अधिक माहिती अशी की, लोटली वेर्णा मार्गावरुन शुक्रवारी ट्रक चालला होता. यावेळी ट्रक चालकाचं ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने रस्त्याबाहेरील झाडाला धडक दिली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर स्पीड लिमिट फलक लावा अशी मागणी लोटलीतील स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचाःघरघर चलो अभियानास पार्सेकरांना भरघोस प्रतिसाद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!