थरारक! भरधाव ट्रकने चिरडलं आणि ट्रकच्या टायरखाली येऊन जागीच ठार

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्को : राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. बुधवारी वास्कोमध्ये भीषण अपघात झाला. या अपघात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका भरधाव ट्रकने पादचाऱ्याला चिरडलं. यामध्ये पादचाऱ्याचा ट्रकच्या टायरखाली येऊन जागीच अंत झालाय.
एफ. एळ गोम्स मार्गावरील टिळक मैदानासमोर बुधवारी पहाटे हा अपघात झाला. यामध्ये आमिशेट्टी गिरी या ३७ वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. याप अपघाताप्रकरणी वास्को पोलिसांनी पंचनामा केलाय.
या भीषण अपघातात ठार झालेला इसम आंध्र प्रदेशचा असल्याचं कळतंय. तो एका कामानिमित्त वास्कोमध्ये आला होता. बुधवारी पहाटे तो टिळक मैदानालगतच्या रस्त्यावरून चालत जात होता. त्यावेळी मुरगाव बंदरातून माल घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या एका ट्रकाने त्याला चिरडलं.
ठोकर बसल्यावर तो उसळून रस्त्यावर पडला. यानंतर ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच अंत झाला. आमिशेट्टी गिरी हा आंध्रप्रदेशचा रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असली तरी वास्कोमध्ये तो कोणत्या कामासाठी आला होता, हे कळू शकलेलं नाही. मृत्यू झालेला वास्कोमध्ये कुठे राहत होता ही माहिती उपलब्ध झालेली नाही.याप्रकरणी वास्को पोलिस अधिक तपास करीत आहेत.