भीषण! डिस्चार्ज घेऊन घरी चालले होते, पण वाटेतच काळानं घाव घातला

भीषण अपघातात ७० वर्षीय इसमाचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : राज्यात मंगळवार हा अपघातवार ठरलाय. फोंड्यामध्ये ट्रक आणि कंटेनरचा विचित्र अपघात झालाय. या अपघातात एका वृद्धाचा जागीच मृत्यू झालाय.

मंगळवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजता वेलिंग प्रियोळ इथं अपघात झाला. डिव्हायडरच्या जवळ आल्यानंतर कंटेनर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भीषण अपघात घडला. डिव्हाडरला धडकून कंटेनरच्या रॉंग साईडला घुसला. यावेळी पणजीहून फोंड्याच्या दिशेनं येणाऱ्या गाड्यांना कंटेनरनं धडक दिली. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एक मारुती 800 कारही या अपघाताचा शिकार ठरली. या कारमधील एकाचा अपघात जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघेजण गंभीर जखमी झालेत.

नेमका कसा घडला अपघात?

एमएच-43-बीजी-9703 क्रमांकाचा कंटेनर वाहू ट्रेलर फोंड्याहून कुंडईच्या दिशेने निघाला होता.  वेलिंग येथील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर ने दुभाजक ओलांडून फोंड्याच्या दिशेने जाणाऱ्या केए-56- 4523 क्रमांकाच्या मालवाहू ट्रकला तसेच त्या ट्रक मागून येणाऱ्या जीए- 01-आर-2193 या मारुती कारला ठोकर दिली. 

या अपघातातील मृत इसमाची कहाणीही हृदय हेलावणारी अशी आहे. अपघातात मृत्यू झालेल्या विश्वनाथ नाईक यांच्यावर खरंतर गेल्या 4 दिवसांपासून बांबोळीच्या जीएमसीतच उपचार सुरु होते. त्यांना मंगळवारी डिस्चार्ज मिळाला होता. मात्र घरी जात असतानाच त्यांच्यावर काळानं घाला घातला. 70 वर्षीय विश्वनाथ नाईक यांचा या अपघातात दुर्दैवी अंत झाला. तर त्यांच्यासोबत असणारे त्यांचे नातेवाईकही गंभीररीत्या या अपघातात जखमी झालेत. त्यापैकी जखमी दामू नाईक ह्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.

दरम्यान, या अपघातानंनतर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अपघात झालेल्या ठिकाणाचा पंचनामाही केला. एकूण राज्यातील रस्ते अपघातांची धग काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नसल्याचं या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.

कपिलेश्वरी- ढवळी येथील विश्वनाथ नाईक (70) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रेलर चालक अपघातानंतर फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत दरम्यान. दामू नाईक, शशिकांत नाईक गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा अपघाताचे अंगावर काटा आणणारे फोटो

हेही वाचा – अटल सेतूवर भीषण अपघात, कंटेनरचा पार चेंदामेंदा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!