रेती वाहून नेणारा डंपर उलटल्यानं तब्बल 4 तास वाहतूक ठप्प

रस्त्याच्या मधोमधच डंपर उलटला

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. धारगळला झालेला अपघातानंतर आता फोंड्यामध्येही डंपरचा अपघात झालाय. सुदैवानं या अपघात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मात्र मोठं आर्थिक नुकसान झालंय. महत्त्वाचं म्हणजे या अपघातामुळे तब्बल 4 तासापेक्षा जास्त वेळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती.

आपेव्हाळ केरीजवळ डंपर उलटून अपघात झालाय. या अपघातात डंपरचा चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. रेतू वाहून देणारा ट्रक आपेव्हाळजवळ उलटला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. आपेव्हाळजवळ उतरणीजवळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि डंपर पलटी झाला असल्याचं बोललं जातंय.

सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातानंतर डंपरमधील सर्व रेती रस्त्यावर पडली होती. रस्त्याच्या मधोमध डंपर पलटी झाल्यानं काही काळ या भागातील वाहतूक खोळंबली होती. हा अपघात घडला तेव्हा समोरुन कोणतीही गाडी येत नव्हती. त्यामुळे मोठं अनर्थ टळलाय. या डंपरमधील संपूर्ण रेती रस्त्यावर सांडल्यानं दुचाकीस्वारांना या मार्गावरुन जाताना कसरत करावी लागतेय.

नेमकं या अपघाताचं कारण कळू शकलेलं नाही. मात्र या अपघातातून डंपरचा चालक बालंबाल बचावलाय. जखमी चालकावर जीएमसीमध्ये उपचार सुरु आहेत.

पाहा अपघाताचा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!