दीड वर्षाचं बाळ थोडक्यात बचावलं! अपघातात कारचा चक्काचूर, 6 जण जखमी

कार दुचाकीचा भीषण अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : फोंडा तालुक्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एका दीड वर्षांच्या चिमुकल्यासह सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. पार, उसगाव इथं सोमवारी संध्याकाळी हा अपघात घडला.

हेही वाचा – भीषण! ट्रकच्या धडकेत आईचा दुर्दैवी मृत्यू, बालिका जखमी

कोण कोण जखमी?

सोमवारी संध्याकाळी कार आणि दुचाकीनं पार उसगाव इथं एकमेकांना धडक दिली. यामध्ये कारचालक आकाश वाघेकर, अजिकेश वाघेकर तर दुचाकीवरील लालासे, गीता सेन आणि त्यांचं दीड वर्षांच्या बाळाला गंभीर दुखापत झाली आहे. या तिघांनाही जीएमसी उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तर अन्य तिघांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलंय.

हेही वाचा – डिस्चार्ज घेऊन घरी चालले होते, पण वाटेतच काळानं घाव घातला

कसा झाला अपघात?

जीए ०५ बी ३०३२ ही कार फोंड्याहून गुळेली इथं जात होती. त्याचवेळी पार येथील शीतल बारसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला बाजू देताना कारची धडक वीज खांबाला बसली. त्याचवेळी दुचाकीवरुन आपल्या दीड वर्षाच्या बाळाला घेऊन जाणाऱ्या दाम्पत्यालाही कारची ठोकर बसली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

हेही वाचा – धुक्याचा कहर! भीषण अपघात, 13 जणांवर काळाचा घाला

या अपघातानंतर जखमींना जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तर तिघांना जीएमसीमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं. फोंडा पोलिस स्थानकाचे हवालदार निलेश भामईकर यांनी या अपघाताचा पंचनामा केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!