ACCIDENT | नुवे येथील अपघातात युवक ठार

मंगळवारी संध्याकाळची घटना; कार-दुचाकी यांची टक्कर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यातील बेकार झालेले रस्ते, भटकी गुरं इ. कारणांमुळे अपघातांची प्रकरणं वाढली असल्याचं बोललं जातंय. अपघातांची संख्या वाढण्यासोबतच अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांची संख्या देखील वाढतेय. दक्षिण गोव्यातील नुवे भागात असाच एक भीषण अपघात घडलाय. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असल्याचं समजतंय.

हेही वाचाः सावंत हे गृहमंत्री नात्याने असफल

कार आणि दुचाकी यांची धडक

नुवे येथे कार आणि दुचाकी यांची धडक झाल्यानं झालेल्या अपघातात फ्रान्सिस रॉड्रिग्स या २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी कारचालक रवी तालगडी (२७, खारेवांद) याच्यावर मायणा कुडतरी पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.

मंगळवारी संध्याकाळी झाला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळी मोडा – नुवे येथील ऑस्कर जंक्शन परिसरात हा अपघात घडला. यावेळी रवी आपली कार घेऊन मुरिडाहून मडगावच्या दिशेने येत होता, तर फ्रान्सिस दुचाकीवरून विरुद्ध दिशेने जात होता. दरम्यान जंक्शन परिसरात पोचले असता कारची जोरदार धडक विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला बसली आणि फ्रान्सिस दुचाकीवरून रस्त्यावर फेकला गेला. यामुळे तो गंभीर जखमी झाला, त्याच परिस्थितीत त्याला त्वरित हॉस्पिसीओ हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केलं. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

हेही वाचाः काय भुललासी वरलीया रंगा

अपघाताचं सत्र सुरुच

रोज अनेक अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

हा व्हिडिओ पहाः NATIONAL HIGHWAY WORK | हायवे कंत्राटदाराच्या मुजोरीची केंद्रीयमंत्री गडकरी दखल घेतील ?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!