ACCIDENT | धारबांदोड्यात महाराष्ट्र-गोवा वाहन टक्कर; एकजण जखमी

दुचाकी आणि चारचाकीचा अपघात; सुदैवाने जिवीतहानी नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः राज्यात कोरोना महामारीसोबतच अपघातांचं सत्र हे सुरूच आहे. रविवारी 13 जून रोजी पणसुले धारबांदोडा येथे एक अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र दुचाकीस्वार चांगलाच जखमी झालाय.

हेही वाचाः ACCIDENT | कुठ्ठाळी अपघातात एक महिला ठार

नक्की काय झालं?

रविवारी 13 जून रोजी पणसुले धारबांदोडा येथील बगल रस्त्यावर संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकी आणि चारचाकी यांच्यात जोरदार टक्कर झाली आणि अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार रोहित कल्लू सिंग (२०, रा. प्रतापनगर- धारबांदोडा) हा गंभीर जखमी झाला.

हेही वाचाः ACCIDENT | शिवोली पुलावर जीपच्या धडकेत दोन गुरं ठार

जखमीला हॉस्पिटलात केलं दाखल

हा अपघात एवढा जोराचा होता की दुचाकीस्वार चांगलाच जखमी झाला. अपघात झाल्यानंतर लगेच उपस्थितांनी धावपळ करून जखमीला  अगोदर पिळये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तिथून अधिक उपचारार्थ जीएमसीत दाखल केलं आहे.

हेही वाचाः ACCIDENT | अज्ञात वाहनाने ठोकरल्याने युवकाचा मृत्यू

महाराष्ट्र-गोवा यांच्यात टक्कर

प्राप्त माहितीनुसार रोहित कल्लू सिंग हा आपल्या जीए-०५-ए- ४१७५ क्रमांकाच्या दुचाकीवरून फोंड्याहून धारबांदोड्याच्या दिशेने जात होता. त्याचवेळी धारबांदोड्यातून फोंडयाच्या दिशेने येणाऱ्या एमएच-०२-एफएल- ५१४५ क्रमांकाच्या वोल्वो कारला त्याची धडक बसली. यात रोहित यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला १०८ वाहनातून आधी पिळये प्राथमिक आरोग्य केंद्र व तेथून जीएमसीत पाठवण्यात आले आहे. फोंडा पोलिसानी अपघाताचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!