धारगळ हायवेवर हॉटमिक्स खडीवाहू ट्रक उलटला, चालक बालंबाल बचावला

गेल्या २४ तासांतला दुसरा अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : धारगळ महाखाजन येथे राष्ट्रीय महामार्गावर सकाळी एक हॉटमिक्स खडीवाहू ट्रक उलटला. या अपघातात सुदैवाने प्राणहानी झाली नाही. अपघातग्रस्त ट्रकाचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना घडली त्यावेळेला या ट्रकाच्या बाजूने कोणतेही वाहन नसल्यामुळे अनर्थ टळला. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या बेपर्वाईचे थेट परिणाम आता दिसू लागलेत. अलिकडच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात अपघात घडताहेत. वाहतूक तथा पीडब्लूडी खात्याची यंत्रणा मात्र सुस्त बसून आहे.

अपघातांचं सत्र

मंगळवारी कोलवाळ येथे टेंपो आणि प्रवासी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात टेंपो चालकाचा मृत्यू झाला. या व्यतिरीक्त बसमधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. याठिकाणी हायवेचे काम सुरू आहे. कुठेही दीशादर्शक फलक लावण्यात आलेले नाहीत. सगळा कारभार रामभरोसे सुरू असून लोकांच्या जिवाची अजिबात पर्वा ना कंत्राटदाराला ना सरकारी यंत्रणांना अशी परिस्थिती बनलीए. रात्रीच्या वेळी तर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. या एकूणच बेपर्वाईकडे सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधुनही कुणीही त्याची दखल घेत नसल्याची लोकांची भावना बनलीए. या हायवेचे काम करणारा कंत्राटदार मेसर्स एमव्हीआर इन्फ्रा याचे राजकीय वजन मोठे असल्याने हा कंत्राटदार सरकारी अधिकारी आणि आमदार, मंत्र्यांनाही कस्पटासमान वागवत असल्याची उघड चर्चा सरकारी खात्यांतच सुरू आहे.

हेही वाचा – कोलवाळमध्ये खासगी बसचा भीषण अपघात

हायेवरीचा कामाचा फटका

सध्या ठिकठिकाणी रस्त्यांच्या हॉटमिक्सिंगची कामे जोरात सुरू आहेत. या अनुषंगाने हायवेवर मोठ्या प्रमाणात टीप्परची वाहतूक सुरू आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या या टीप्परमुळे वाहनचालकांची आणि विशेष करून दुचाकीचालकांची चांगलीच गाळण उडते. पीडब्लूडी आणि वाहतूक खात्याने संयुक्तरित्या पाहणी करून ताबडतोब दीशादर्शक फलक तसेच महत्वाच्या ठिकाणी बॅरीकेडस घालण्याची गरज आहे, असे मत कोलवाळचे एक स्थानिक राजकुमार आडीवरेकर यांनी सांगितले.

हेही वाचा – या आहेत ५ घोषणा, ज्या आज मुख्यमंत्री करण्याची दाट शक्यता आहे!

या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळेच बार्देश तालुक्यात सध्या भीषण पाणी टंचाईला सामना करावा लागतो. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे काम सदर कंत्राटदारालाच मिळाले आहे. हे काम बेजबाबदारपणे केले जातेय. कामाच्या ठिकाणी कुणीही जबाबदारी अधिकारी हजर असत नाही तसेच याठिकाणी कामगार आपल्या मर्जीनुसार या पाईपलाईन्स टाकत असल्याने भविष्यात ही मोठी डोकेदुखी ठरू शकेल,अशी शक्यताही आडीवरेकर यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा – गोवा नंबर प्लेटच्या चालत्या गाडीचा टायर फुटला….

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!