धक्कादायक! मंगळुरूहून गोव्यात परतत होते, पण वाटेतच मृत्यूनं गाठलं

रात्री 11 वाजताच्या सुमारास होत्याचं नव्हतं झालं

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण : राज्यातील अपघाताचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. वर्षाच्या शेवटी रत्नागिरीच्या कशेडी घाटात बस उलटून अपघात झाला होता. वर्षाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या या अपघातानंतर आता 2021 या वर्षातही अपघातांची मालिका सुरुच आहे. काणकोणात एक भीषण अपघात झालाय. या अपघाता एका महिलेचा मृत्यू झाला असून तिघे जण जखमी झालेत. अपघातातील मृत महिला वार्का येथील रहिवासी आहे. या अपघातात गाडीचा चक्काचूर झालाय.

नेमकी कुठे झाला अपघात?

काणकोणच्या भगतवाडामध्ये एका खासगी कारचा अपघात झाला. कारचालकाचा अचानक गाडीवरील ताबा सुटला. हा अपघात इतका भीषण होता की कार अपघातात पलटी झाली. या अपघातात एक 49 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. एकूण 6 प्रवासी या कारमध्ये होते. त्यापैकी तिघेजण जखमी झालेत. महत्त्वाचं म्हणजे मिलाग्रिना रिबेलो असं अपघातात मृत झालेल्या महिलेचं नावंय. त्यांच्या मृत्यूनं रिबेलो कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तर अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कशामुळे झाला अपघात?

मंगळुरुहून खासगी कार गोव्याच्या दिशेने येत होती. मात्र काणकोणच्या भगतवाडा भागात होत्याचं नव्हतं झालं. कारचालकाचं अचानक गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडीचा अपघात झाला. गोवा रजिस्टर असणारी ही गाडी दुर्घटनाग्रस्त झाली. रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नसल्याचं अधोरेखित झालंय.

काळजी घ्या, जीव महत्त्वाचाय!

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर गोवनवार्ता लाईव्ह आपल्या सर्व वाचकांना आवाहन करतंय, की वाहन चालवताना काळजी घ्या. शक्यतो रात्रीचा गाडीनं प्रवास करणं टाळावं. तसंच गाडीच्या वेगावरही नियंत्रण ठेवावं. गाडी चालवताना बेजबाबदारपणे वागल्यानं कोणत्याही क्षणी मृत्यू हुलकावणी देऊ शकतो. त्यामुळे काळजी करण्यापेक्षा, काळजी घ्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!