ACCIDENT | अनमोड घाटात अपघात

वाहन दरीत कोसळले; मंगळवारी पहाटेची घटना; सुदैवाने जिवीतहानी टळली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः अनमोड घाटातून गोव्याहून कागदाचा कच्चा माल घेऊन येणाऱ्या वाहनासमोर कर्नाटक हद्दीत अचानक दुसरे वाहन आल्याने वाहन बाजूला घेण्याच्या नादात थेट दरीत कोसळल्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजता घडली. अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवजड वाहनांसाठी रस्ता असुरक्षित

अनमोड घाटमार्ग हा अवजड वाहनांसाठी सुरक्षित नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तरी सध्या हलक्या वाहनांना सदर मार्ग खुला करण्यात आला आहे. परंतु सदर मार्गाचे काम अर्धवट आहे.

संरक्षक कठड्यांचा अभाव

अनमोड घाटात पूर्वी काम केलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने बनवलेला रस्ता हा बऱ्याच ठिकाणी घाटामध्ये खाली उतरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच या घाटामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे नाहीत त्याचबरोबर रस्ता अरुंद असल्यामुळे समारून एखादे वाहन अचानक आल्यास वाहन रस्ता साडून थोडेजरी खाली उतरविल्यास सरळ दरीतच कोसळत आहेत. त्यामुळे या घाटात संरक्षण कठडे करण्याची वाहनधारकांतून मागणी करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!