ACCIDENT : आसगावात कारची विजेच्या खांबाला धडक…

चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने अपघात

Goan Varta Live | प्रतिनिधी

प्रतिनिधी : सौरव शिरोडकर

म्हापसा : गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येतायत. पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही.
हेही वाचाःमांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंतांना “आंतरराज्य सामाजिक सेवा गौरव पुरस्कार” जाहिर…

विजेचा खांब रस्त्यावर कोसळला

दरम्यान, गुरुवारी दुपारी आसगाव येथील आग्नेल इन्स्टिट्यूटजवळ एका स्विफ्ट कारने विजेच्या खांबाला धडक दिल्याने अपघात झाला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याचं समजतंय. अपघातातील जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. दरम्यान कारच्या धडकेने विजेचा खांब रस्त्यावर कोसळल्यामुळे खोर्ली आणि आसगावात वीजपुरवठा खंडीत झालाय.
हेही वाचाःकेरळमध्ये बसचा भीषण अपघात; ९ जणांचा मृत्यू, ३८ जखमी…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!