वाळपई रेडेघाटीमध्ये विचित्र अपघात, गॅस सिलिंडरची गाडी उलटली

अपघातात एकाची प्रकृती चिंताजनक

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

सत्तरी : राज्यातील अपघातांचं सत्र सुरुच आहे. वाळपईतील रेडेघाटीमध्ये विचित्र अपघात झालाय. या अपघातात गॅस सिलिंडर टॅम्पो उलटला. दोन दुचारी आणि गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या टॅम्पोमध्ये हा अपघात झाला. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.

हेही वाचा – AAP | Politics | शुभमच्या एन्ट्रीनं आपची वाळपईत ताकद खरंच वाढेल? #Goa #Marathi #News

थोडक्यात अनर्थ टळला

या अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. अपघाताना बघ्यांची गर्दीही या ठिकाणी जमली होती. दरम्यान, अपघातग्रस्त टॅम्पोमध्ये भरलेले सिलिंडर होते की रिकामे, याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. या अपघातात टॅम्पोसह दुचाकींचही नुकसान झालंय. साधारण दहा साडेदहाच्या दरम्यान हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते.

हेही वाचला – Special Report | Corona | महामारीत वाढत्या गर्दीनं ग्रामीण जनतेच्या मनात भीती

हेही वाचा – अरे बापरे! चौघांचा मृत्यू तर कोरोनाचे नवे 473 नवे रुग्ण

अधिक तपास सुरु

दरम्यान, एकूण राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. दक्षिण गोव्यासोबत आता उत्तर गोव्यातही वाढत्या रस्ते अपघातांनी चिंता वाढवली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हेही वाचा – हृदयद्रावक! अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त! आईसह 3 मुलींचा दुर्दैवी अंत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!