भरधाव इनोव्हाची गुरांना धडक! दोन गुरं जागीच दगावली

मोकाट गुरांचा बंदोबस्त कधी होणार?

देविदास गावकर | प्रतिनिधी

वाळपई : राज्यातील अपघाताचे सत्र सुरूच आहे. वाळपई हेल्थ सेंटर समोर एक कारचा अपघात झालाय. गुरुवारी रात्री झालेल्या या अपघातात दोन गुरे दगावली आहेत.

नेमकी काय घटना?

वाळपई हेल्थ सेंटरच्या समोर गुरुवारी रात्री एका इंनोव्हा कार चा अपघात झाला. या अपघातात कारने दोन गुरांना ठोकर दिली. भरधाव वाहनाने दिलेल्या या धडकेत दोन गुरे जागीच दगावली. सुदैवाने गाडीतील कुणालाही या अपघातात दुखापत झाली नाही. मात्र गाडीच्या बंपरचे नुकसान झाले आहे. ही गाडी फोंडाच्या दिशेनं जात असताना अपघात घडलाय.

रास्त्यावरील गुरांचं काय करायचं?

राज्यातील वेगवेगळ्या रस्त्यांवर मोकाट जनावरं दिसून येत आहेत. अशातच रात्रीच्या वेळीही वाहनांना या गुरांच्या अडथळल्याला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे वाळपईमध्ये जसा अपघात झाला तसे अपघात भविष्यात आणखी होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!