ACCIDENT | रस्त्याचा अंदाज न आल्याने झाला अपघात

वाडे-वास्कोतील घटना; मालवाहू ट्रकने वाहनांना ठोकलं; रस्त्यालगत उभ्या केलेल्या 5 दुचाकी आणि 2 कारचं केलं नुकसान

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोः वाडे येथे एका मालवाहू ट्रकने अरुंद भागातून पुढे जाताना रस्त्याकडेला उभ्या केलेल्या दोन कार आणि पाच दुचाकींना धडक दिली. यात वाहनांची मोडतोड होऊन मोठं नुकसान झालं.

हेही वाचाः ACCIDENT | कोलवाळमध्ये खासगी बसचा भीषण अपघात

5 दुचाकी आणि 2 कारचं नुकसान

चिखली चौक ते सेंट अँड्र्यू चौकपर्यंतच्या रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. वाहनचालकांना खबरदारी घेऊन वाहनं हाकावी लागताहेत. सोमवारी रात्री एका अवजड वाहनचालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्त्याकडेला उभी करण्यात आलेल्या वाहनांना ठोकरत ते वाहन पुढे गेलं. सदर प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी त्या ट्रकचालकाला ताब्यात घेतलं. या अपघातात दोन कार व पाच दुचाकींचं नुकसान झालं.

हेही वाचाः ACCIDENT | चालत्या गाडीचा टायर फुटला….

अरुंद रस्त्यामुळे वाढते अपघात

चिखली चौक ते मुरगाव बंदरापर्यंत भूगटारांची दुरुस्ती करण्यात येत असून, रस्त्याला उंची देण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. सदर काम संथगतीने सुरू आहे. तसंच वाडे तळ्याजवळच्या रस्त्यावरील भूगटाराने जुने पाईप बदलून तिथे मोठ्या आकाराचे पाईप घालण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. सदर रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक बनला आहे. इथे सतत घडणाऱ्या अपघातामुळे सदर भूगटाराने काम युद्धपातळीवर पूर्ण होणं गरजेचं होतं. मात्र काम संथगतीने सुरू आहे. या परिसरात अपघात होऊ नये यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.

हेही वाचाःACCIDENT | रेल्वेच्या धडकेत एकाचा मृत्यू

हेही वाचाः ACCIDENT ! धावत्या रेल्वेवर आदळला ट्रक

हा व्हिडिओ पहाः Video | Panaji Accident | …आणि एक्सप्रेसो एक्टीव्हावर चढली!

हेही वाचाः ACCIDENT | गोवा-महाराष्ट्राची जोरदार टक्कर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!