ACCIDENT | सुकतळे – मोले येथे अपघात

कार-स्कूटरचा अपघात; एकाचा मृत्यू; दुचाकीचा चक्काचूर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. राज्यातील बेकार झालेले रस्ते, भटकी गुरं इ. कारणांमुळे अपघातांची प्रकरणं वाढली असल्याचं बोललं जातंय. अपघातांची संख्या वाढण्यासोबतच अपघातांमध्ये मृत पावणाऱ्यांची संख्या देखील वाढतेय. दक्षिण गोव्यातील मोले भागात असाच एक भीषण अपघात घडलाय.

हेही वाचाः मुंडकार, अनधिकृत घरे, म्युटेशन तातडीने निकालात काढा

कुठे झाला अपघात?

दक्षिण गोव्यातील सुकतळे – मोले येथे भीषण अपघात झालाय. कार आणि स्कूटरमध्ये हा अपघात झाल्याचं समजतंय. अपघात होण्यामागे नक्की कारण काय? कुणाच्या चुकीमुळे अपघात झाला? या प्रश्नांची उत्तर अद्याप सापडलेली नाहीत.

एकाच मृत्यू

झालेला अपघात हा बराच भीषण होता. या अपघातात एकाचा मृत्यू झालीची माहिती समोर येतेय. अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव सरमेश किर्लोस्कर (३८, धाटफार्म) असं आहे. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अपघाताच्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचाः SUPERFAST NEWS | महत्त्वाच्या घडामोडींचा Express आढावा

अपघाताचं सत्र सुरुच

रोज अनेक अपघातांच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

हा व्हिडिओ पहाः Shocking Accident | CCTV | ….म्हणून रस्ता ओलांडताना नेहमी सतर्क राहावं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!