ACCIDENT | फोंडा, मडगाव येथे अपघात

फोंडा अपघातात दुचाकीस्वार जखमी; तर मडगाव अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः बातमी आहे राज्यातील अपघातांची…राज्यात अपघातांच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. गुरुवारी फोंडा तसंच मडगाव भागात दोन अपघात झालेत. फोंडा येथील अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून मडगाव येथील अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय.

कार – दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जखमी

पणजी – फोंडा महामार्गावर गुरुवारी दुपारी कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. अपघात झाला नेमके त्याच वेळेला कला संस्कृती खात्याचे मंत्री घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी गाडी थांबवून १०८ रुग्णवाहिकेला पाचारण केले आणि जखमी दुचाकीस्वाराला फोंडा आयडी उपजिल्हा हॉस्पिटलात पोहोचवलं. फोंडा पोलिसांनी अपघात स्थळी येऊन वाहनं हटवली. या अपघातात दुचाकीचं मोठं नुकसान झालं.

नावेली येथील अपघातात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

नावेली-मडगाव येथे झालेल्या एका रस्ता अपघातात ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी घडली. मडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचोणे येथील जॉर्ज आब्रे हे ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक दुचाकीने चिंचोणेच्या दिशेहून मडगावच्या दिशेला येत होते. नावेली जवळील एका कार शोरूमजवळ त्यांचा वाहनावरील ताबा गेला आणि ते खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला जखम झाली. त्यांना मडगावच्या खासगी हॉस्पिटलात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचाराला सुरूवात केली तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती मडगाव पोलिसांनी दिली आहे.

राज्यात अपघातांचं सत्र सुरूच

रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

हा व्हिडिओ पहाः Goa Entry Point | Patradevi Checkpost | तपासणीसाठी पत्रादेवी चेकपोस्टवर गर्दी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!