Accident | समोरासमोर टक्कर होणार होती, ती चुकवण्याच्या नादात गाडी खाली कोसळली!

सातार्डे पुलाजवळ अल्टो कारचा अपघात

नारायण पिसुर्लेकर | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात बेफामपणे गाड्या चालवणाऱ्यांमुळे अपघाताचं सत्र सुरुच असल्याचं सातत्यानं पाहायला मिळालंय. दरम्यान, रविवारी दुपारच्या सुमारच्या एका अल्टो कारचा अपघात झाला. मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नेमकं काय झालं?

सातार्डे पुलाच्या पुढे एक दीड किलोमीटरच्या अंतरावर एका अल्टो के-टेन कारचा अपघात झाला. यामध्ये गाडी रस्त्यावरुन खाली कोसळली. गाडी रस्त्यावरुन इतकी खाली गेली की चक्क क्रेनच्या मदतीनं या कारला बाहेर काढावं लागलंय. सातार्डे पुलाच्या पुढे काही अंतरावरच दुपारच्या सुमारात हा अपघात झाला. एका अपघाती वळणावर समोरुन भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीशी होणारी ठोकर चुकवण्याच्या नादात हा सगळा प्रकार घडला. यामध्ये कोणाला दुखापत किंवा जखम झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. स्थानिकांनीही तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त गाडीतील लोकांना वाचवलंय. पेडणे तालुक्यातील नायबाग इथं ही घटना घडली आहे.

हेही वाचा : भीषण अपघातात अख्खं कुटुंब उद्ध्वस्त

दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील वाहनचालकांनी जबाबदारीने आणि वेगावर नियंत्रण ठेवून गाड्या चालवण्याची गरज व्यक्त केली जातेय. अन्यथा राज्यातील अपघाताच सत्र कधीच थांबणार नाही, हे नक्की! दरम्यान, या अपघातात थोडक्यात निभावलंय. या अपघाताचे फोटो पाहून ही घटना किती भीषण होती, याची कल्पना करता येऊ शकेल.

हेही वाचा : भीषण! डिस्चार्ज घेऊन घरी चालले होते, पण वाटेतच काळानं घाव घातला

पाहा अपघाताचे फोटो

हेही वाचा : ओल्ड गोवा बायपासरोडवर भीषण अपघात, अंगावर काटा आणणारे Photo समोर

पाहा खास पेशकश | इलेक्शन Special

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!