नागझरजवळ अल्टो कारचा अपघात! चालक आश्चर्यकारकरीत्या बचावला

वाहनचालकांनो, मुसळधार पावसात गाड्या सावकाश चालवा

नारायण पिसुर्लेकर | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यातील अपघातांचं सत्र सुरुच आहे. नागझर जवळ झालेल्या एका कारच्या अपघातातून चालक थोडक्यात बचावला आहे. धारगळ-नागझरजवळ गुरुवारी अल्टो कारचा अपघातग्रस्त झाली. मात्र सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कशामुळे अपघात झाला?

अल्टो कारच्या अपघाताचे फोटो समोर आले आहेत. करड्या रंगाची एक अल्टो कारच्या रस्त्याच्या एका बाजूला जाऊन धडकली असल्याचं समोर आलंय. या अपघातात कारच्या बोनेटचं नुकसान झालंय. रस्त्या सोडून खाली घसरल्यामुळे या गाडीच्या उजव्या बाजूचं मागचं चाकही वर आल्याचं पाहायला मिळतंय. रस्ता सोडून ही कार खाली रुतून गेली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या अपघातातून चालक थोडक्यात बचावला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय.

मुसळधार पावसामुळे आधीच दृश्यमानता कमी झाली आहे. त्यात एका तीव्र वळणावर हा अपघात झाला, असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. दरम्यान, जी कार अपघातग्रस्त झाली आहे, त्या कारचा नंबर कळू शकलेला नाही. प्राथमिक अंदाजनुसार वेगावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातो आहे.

मात्र या अपघातामुळे पावसात गाड्या चालवताना अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. तीव्र वळणावर अंदाज न आल्यानं वाळपईतही काही दिवसांपूर्वी एका टेम्पो आणि स्कूटीचा अपघात झाला होता. त्यामुळे तीव्र वळणांसोबत मुसळधार पावसात वाहनं सावकाश चालवण्याचं आवाहन केलं जातंय.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!