ACCIDENT | अजून एक अपघात; दुचाकी चालकाचा मृत्यू

तोरसे पेडणे महामार्गावर अपघात

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः बातमी अपघाताची…. पाचव्या दिवशी राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. यावरून राज्याचील अपघातांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढतेय हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. गुरुवारी सकाळी तोरसे पेडणे मार्गावर मोठा अपघात झाल्याचं समजतंय. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झालाय.

कुणाचा अपघात?

तोरसे – गोवा येथे बीएड कॉलेज नजीक अपघात झाल्याचं समजतंय. या अपघातात कुडाळ येथील युवक जागीच ठार झाला आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर हा अपघात घडला आहे. या अपघातात युवक जागीच ठार झाल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

टेम्पोने दिली धडक

मृत तरुणाचं नाव योगेश परब (वय वर्षं २७) असल्याचं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून समोर आलंय. तो गोव्यात कामानिमित्त येत असताना वाटेतच काळाने त्याला गाठलंय. मुंबई-गोवा महामार्गावर तोरसे पेडणे इथे समोरून येणाऱ्या टेम्पोने योगेशच्या बाईकला जोराची धडक दिल्याने हा अपघात झालाय. ही धडक एवढी जोराची होती, की यात योगेशचा जागीच मृत्यू झाला.

पोलिस तपास सुरू

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसंच पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू आहे, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

अपघातांचं सत्र कायम

राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!