ACCIDENT | चालत्या गाडीचा टायर फुटला….

कार संरक्षक लोखंडी पट्टीला मोटार धडकली

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः अपघातांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. या ना त्या कारणाने अपघात होतच आहे. कधी चालकाचा निष्काळजीपणा नडतो, तर कधी खराब रस्ते अपघातासाठी कारणीभूत ठरतात. एकूणच काय, तर एकही दिवस अपघाताच्या बातमी ऐकल्या किंवा वाचल्याशिवाय जात नाही. मंगळवारी मुंबई-गोवा महामार्गावर असाच एक अपघात घडलाय.

हेही वाचाः कोलवाळमध्ये खासगी बसचा भीषण अपघात

नक्की काय झालं?

भरधाव वेगात जात असलेल्या एका कारचा टायर अचानक फुटून मोठा अपघात घडल्याची घटना घडलीये. कारचा अचानक टायर फुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक लोखंडी पट्टीला आदळलीये. यात कारचं बरंच नुकसान झालंय.

हेही वाचाः दुर्दैवी! गॅस सिलिंडर आणि दुचाकींच्या विचित्र अपघातात तरुणाचा मृत्यू

नेमका कुठे घडला अपघात?

मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या नेमळे या ठिकाणी कारचा अपघात झाल्याचं समजतंय. मंगळवारी संध्याकाळी साडेचार वाजता हा अपघात घडल्याची माहिती मिळालीये. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

हेही वाचाः वाळपई रेडेघाटीमध्ये विचित्र अपघात, गॅस सिलिंडरची गाडी उलटली

गोवा पासिंग कारचा अपघात

जीए04ई6224 क्रमांकाची ही कार गोव्याहून कुडाळच्या दिशेने भरधाव वेगात जात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान नेमळे येथे मोटारीचा मागील टायर अचानक फुटला. यात चालकाचा कारवरील ताबा सुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या कडेला संरक्षक कठड्यावर धडकली. दरम्यान सुदैवाने एअर बॅग उघडल्याने चालकाला कोणती दुखापत झाली नाही. मात्र मोटारीचं मोठं नुकसान झालं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!