ACCIDENT | विजेच्या खांबाला धडकल्याने कार पलटली…

मडगावातील घटना; सुदैवाने कोणतीही जिवीतहानी नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात कोविड महामारी पाठोपाठ अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांच्या बातम्या ऐकल्या वाचल्याशिवाय दिवस सरत नाही. मडगावात रविवारी असाच एक अपघात घडलाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

हेही वाचाः दुर्दैवी! ओल्ड गोव्यातील कार अपघातात पीएसआयचा उपचारादरम्यान मृत्यू

कसा झाला अपघात?

मडगावात ईएसआय कोविड इस्पितळा समोरील रस्त्यावर रविवारी रात्री कारने विजेच्या खांबाला धडक दिल्याने उपघात घडला. या दुर्घटनेत चालकाला दुखापत झाली नाही. मात्र गाडीचं मोठं नुकसान झालं आहे.

हेही वाचाः पर्यटक कारचालक दारुच्या नशेत, कुळेतील अपघातात ४ पर्यटक जखमी

… आणि कार पलटली

याबाबत अधिक माहिती अशी की, रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गाकुवेध फेडरेशनचे सचिव रुपेश वेळीप हे आपल्या कारने मडगावातून घरी निघाले होते. रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील ईएसआय कोविड इस्पितळासमोर त्यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी दुभाजकावरून वीजेच्या खांबावर आदळली व उलटली. गाडी उलटून मागून येणाऱ्या कारवर पडली. या घटनेत चालक रुपेश यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

हेही वाचाः ACCIDENT | रस्त्याचा अंदाज न आल्याने झाला अपघात

पोलिसांकडून अपघाताचा पंचनामा

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. या घटनेत गाडीचं मोठं नुकसन झालं आहे. यानंतर क्रेनद्वारे गाडी बाजूला करून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!