Goa Accident : चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने कुंडई येथे अपघात…

अग्निशमन दलाच्या जवानांनी जखमींची केली सुटका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. बुधवारी मडगावात रिक्षाला वाचवताना कदंब बसचा अपघात झाला. या अपघातात दोन गाड्यांचे नुकसान झाले. तर राय येथे भरधाव कारची रेलिंगला धडक बसल्याने रेलिंगची एक बाजू निखळून रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीस्वारावर पडली. यात दुचाकीस्वार जखमी झाला.
हेही वाचाःपार्टीत सहभागी ‘त्या’ तरुणीची प्रकृती आता ‘स्थिर’…

अपघातातील व्यक्ती किरकोळ जखमी

अशीच एक अपघाताची घटना बुधवारी रात्री कुंडई येथे घडली. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रकमध्ये अडकलेल्या व्यक्तीची अग्निशमन दलाने सुटका केली. अपघातातील व्यक्ती किरकोळ जखमी झाली आहे.
हेही वाचाःचुकीच्या मीटर रिडिंगमुळे भरमसाट पाणी बिल…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!