ACCIDENT |अपघातांची मालिका सुरूच; गावकरवाडा-होंडा येथे टेम्पो कलंडला

कुत्रे आडवे आल्याने अपघात; चालक सुरक्षित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः बातमी अपघाताची…. पाचव्या दिवशी राज्यात अपघातांचं सत्र सुरूच आहे. यावरून राज्याचील अपघातांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढतेय हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. गुरुवारी संध्याकाळी होंडा भागात एक अपघात झाल्याचं समजतंय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

नक्की काय झालं?

गुरुवारी संध्याकाळी गावकरवाडा-होंडा येथे गोवा डेअरीचा दूध वाहतूक करणारा टेम्पो कलंडला असल्याची माहिती हाती येेतेय. गुरुवारच्या दिवसातील हा दुसरा अपघात आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र टेम्पो कलंडल्याने दूधाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.

कसा झाला अपघात?

हाती आलेल्या माहितीनुसार टेम्पो नियोजीत स्थळी जात असताना रस्त्यात कुत्रे आडवे आले. दरम्यान या कुत्र्यांना वाचवण्याच्या नादात टेम्पो चालकाना जोराने ब्रेक लावल्याने टेम्पोचा बॅलन्स गेला आणि टेम्पो एका बाजूने कलंडल्याचं समजतंय.

अपघातांचं सत्र कायम

राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!