ACCIDENT | कुडचडेत अपघात; एकजण जखमी

40 मिनिटं उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ता नाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात एका बाजूने कोरोनाचा तांडव, तर दुसऱ्या बाजूने अपघातांचं सत्र सुरूच आहे. रोज अपघात होत आहेत. रोज लोक मरत आहेत. या अपघातांमध्ये युवकांचं प्रमाण जास्त आहे. निष्काळजीपणा, वाऱ्याच्या वेगाने बाईक चालवण्याचं वेड, दुसऱ्याला मागे टाकून पुढे जाण्याची धडपड या सगळ्यामुळे रस्ते अपघात वाढत चाललेत. रविवारी कुडचडेत एक अपघात झालाय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र अपघातात एक तरुण चांगलाच जखमी झालाय.

हेही वाचाः ACCIDENT | ट्रक घुसला गॅरेजमध्ये; केरी सत्तरी भागात अपघातांचा धोका वाढला

नक्की कुठे झाला अपघात?

रविवारी रात्री कुडचडेत अपघात झाला. पणसाळीमळ रस्त्यावर लागणाऱ्या बाजारपेठेत हा अपघात झालाय. या दोन दुचाकींची धडक झालीये. प्लेजर बाईकने पॅशनला टक्कर दिल्याने अपघात झालाय. या अपघातात पॅशन चालकाला चांगलाच मार लागलाय. अपघातानंतर पोलिसांनी त्याला जवळील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलंय.

हेही वाचाः ACCIDENT | दशावतारी कलावंत भास्कर सुतार यांचा अपघाती मृत्यू

40 मिनीटं झाली तरी रुग्णवाहिकेचा पत्ता नाही

हा अपघात झाल्यानंतर तेथील उपस्थितांनी धावपळ करून पोलिसांना तसंच रुग्णवाहिकेला कळवलं. मात्र 40 मिनीटं वाट पाहूनही रुग्णवाहिका काही अपघाताच्या ठिकाणी पोहोचली नाही. अखेर पोलिसांनी स्वतःच्या जबाबदारीवर जखमीला आपल्या गाडीत घालून हॉस्पिटलपर्यंत नेलं. तसंच कुडचडे पोलिसांनी अपघाताचा पंचनामादेखील केला.

हेही वाचाः ACCIDENT | सांगोल्डा येथील अपघातात युवक ठार

अरुंद रस्ता

ज्या ठिकाणी हा अपघात झालाय तो रस्ता अरुंद असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जातंय. कुडचडे, सावर्डे, सांगे बाजार, चार रस्ता येथील पणसाळीमळ रस्ता हा फारच अरुंद आहे. या रस्त्याच्या आजुबाजुला लोवस्ती असल्यानं येथे रहदारी ही सुरूच असते. त्यामुळे असे अपघात घडत असतात. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी प्रशासनाने या रस्त्याकडे लक्ष देऊन तो वाढवण्याची गरज आहे, असं स्थानिकांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!