ACCIDENT | वाळपई-होंडा मार्गावर भुईपाल येथे टेम्पो-दुचाकीची टक्कर

दुचाकीस्वार गंभीर जखमी; वाळपई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः बातमी अपघाताची…. राज्यासाठी सोमवार हा घातवार ठरला आहे. सोमवारी सकाळपासून राज्याच एकामागोमाग एक असे चार अपघात घडल्याचं समोर आलंय. यावरून राज्याचील अपघातांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढतेय हेच पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. रविवारी मध्यरात्री बांबोळी येथे, सोमवारी पहाटे हडफडे येथे, तर सोमवारी दुपारी केरी पेडणे येथे तीन मोठे भीषण अपघात झालेत, ज्यात एकूण चौघांचा मृत्यू झालाय. त्यानंतर आता वाळपई-होंडा मार्गावर मोठा अपघात झाल्याचं समजतंय.

कुणाचा अपघात?

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी वाळपई-होंडा मार्गावर भुईपाल येथे मोठा अपघात झाल्याचं समजतंय. टेम्पो आणि दुचाकीमध्ये जोरदार टक्कर झाल्याने अपघात झाला असल्याची माहिती हाती येतेय. अपघात नक्की कोणच्या चुकीमुळे झाले याबाबत माहिती मिळालेली नाही.

सुदैवाने जिवीतहानी टळली

तसं पाहता हा अपघात मोठा होता. पण सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. मात्र या अपघातात दुचाकीस्वाराला चांगलाच मार लागल्याने तो जखमी झालाय. त्यामुळे अपघाताच्या वेळी तिथे उपस्थित असलेल्यांनी तातडीने 108 ला बोलावून जखमीला वाळपई येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचं समजतंय. सध्या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं समजतंय.

अपघातांचं सत्र कायम

राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

हा व्हिडिओ पहाः Narendra Modi Birthday | चक्क भंगाराच्या साहित्यापासून साकारला मोदींचा पुतळा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!