भीषण! भोमा येथे अपघातात युवती जागीच ठार

दुचाकीस्वार युवक किरकोळ जखमी

शेखर नाईक | प्रतिनिधी

फोंडा : भोमा येथे सातेरी मंदिराजवळ ट्रक आणि केटीएम दुचाकीदरम्यान भीषण अपघात झाला. यात दुचाकीवर मागे बसलेली युवती जागीच ठार झाली, तर दुचाकीस्वार युवक किरकोळ जखमी झाला.

भोमा बाजारात हा अपघात घडला. स्नेहा प्रभू (वय 21, रा. बोरी) असं मृत युवतीचं नाव आहे, तर वंदित म्हार्दोळकर हा दुचाकी चालक किरकोळ जखमी झालाय. दोघेही खांडोळा इथल्या सरकारी महाविद्यालयात तिसर्‍या वर्षाचं शिक्षण घेत होती.

दरम्यान, 18 नोव्हेंबरलाही उसगाव-वडाकडे भीषण अपघात झाला होता. या अपघातात 20 आणि 21 वर्षांच्या दोघांचा मृत्यू झाला होता. हीट अँड रन केस दाखल करण्यात आली होती. राज्यातील अपघातांचं सत्र वाढतंय हेच आजच्या घटनेनं पुन्हा अधोरेखित झालंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!