ACCIDENT | अपघातांचं सत्र काही थांबेना; बेतोडा येथील अपघातात अजून एक बळी

२८ वर्षीय सेल्विन सांतान फर्नांडिस या युवकाचा मृत्यू

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. रोज नवनवीन अपघाताच्या बातम्या समोर येत आहेत. या अपघातांमध्ये मृत पावणाऱ्या व्यक्तींची संख्याही वाढते आहे. त्यामुळे राज्यभरातून चिंता व्यक्त केली जातेय. सोमवारी रात्री फोंडा तालुक्यात एक मोठा अपघात झालाय. या अपघातात एकाला मरण आलंय. त्यामुळे या परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

नक्की कुठे झाला अपघात?

राज्यातील अपघात वाढत असताना एक नवीन अपघाताची बातमी समोर येतेय. सोमवारी रात्री फोंडा तालुक्यातील बेतोडा जंक्शनजवळ एक अपघात झालाय. अपघात एवढा मोठा होता, की यात एकाचा जगीच मृत्यू झालाय. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा अपघात झाला तेव्हा आजुबाजूला कुणी नव्हतं. त्यामुळे अपघातग्रस्त युवकाला तेव्हा मदत मिळू शकली नाही.

गटारात पडून मृत्यू

अपघात नक्की कसा झाला याविषयीची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. सोमवारी रात्री 11 च्या दरम्यान हा अपघात झाला असल्याचं बोललं जातंय. अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचं नाव सेल्विन सांतान फर्नांडिस (वय वर्षं २८, रा. बेतोडा-फोंडा) या युवकाचा मृत्यू झालाय. अपघात झाल्यानंतर हा युवक रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात पडला. त्यामुळे कुणाचं तिथे लक्ष गेलं नाही. दरम्यान कुणीतरी बघितलं तेव्हा हा अपघात झाला असल्याचं कळून आलं.

सेल्विन सांतान फर्नांडिस

अपघातांचं सत्र कायम

राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!