ACCIDENT | बांबोळीतील भीषण अपघातात एकाचा मृत्यू

एकजण गंभीर जखमी; बांबोळीच्या श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडिअमजवळील दुर्घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबत ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जातेय. या अपघातांमध्ये रविवारी रात्री एका अपघाताची भर पडलीये. रविवारी रात्री बांबोळी परिसरात एक भीषण अपघात घडल्याचं समजतंय. यात एकाचा मृत्यू झाला अजून एकजण गंभीर जखमी आहे. त्यामुळे या परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

कुणाचा अपघात?

रविवारी रात्री पणजीतील बांबोळीच्या परिसरात एक मोठा आणि भीषण अपघात झाल्याचं समजतंय. या अपघातात कारचा पूर्ण चक्काचूर झालाय. तसंच कार चालकाला जागीच मरण आल्याची वाईट घटना घडलीये. बांबोळीतील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमजवळ ही दुर्घटना घडल्याचं समजतंय.

पर्वरी येथील युवकाचा मृत्यू

या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. तर एकजण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. मृत पावलेला युवक हा पर्वरीतील पुंडलिक नगर येथील रहिवासी असल्याचं समजतंय. मृत युवकाचं नाव विराज मेहता असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान फक्त 7 तासांपूर्वी घेतलेल्या नव्या कोऱ्या कारला हा अपघात झालाय.

कारचा चक्काचूर

या अपघाताचे काही फोटोज समोर आलेत. ते फोटोज पाहून हा अपघात किती भीषण होता याची कल्पना येते. या अपघातात गाडीचा पूर्ण चक्काचूर झाला आहे. जीए03झॅड9424 असा या कारचा नंबर आहे. कारचं छप्पर पूर्ण चेपलं असून कारच्या ड्रायव्हर बाजूची दोन्ही दारं मोडून पडली आहेत.

दरम्यान हा अपघात कसा झाला, कुणाच्या चुकीमुळे झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही.

राज्यात अपघातांचं सत्र सुरूच

रोज या ना त्या कारणाने अनेक अपघात झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस यांच्या अपघातांचं प्रमाणही बऱ्यापैकी वाढलेलं दिसतंय. या वाढत्या अपघातांसाठी पाऊस तसंच राज्यातील रस्त्यांची वाईट अवस्था, वेगाने वाहनं हाकणं, स्पर्धा करण्याचं वेड इ. अशी अनेक कारणं जबाबदार आहेत.

हा व्हिडिओ पहाः Huge Fish Dead | 30 ते 35 फूट लांब व्हेल मासा मृतावस्थेत आढळला

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!