अटल सेतूवर अपघात! मात्र थोडक्यात मोठा अनर्थ टळला

भीषण अपघातातून थोडक्यात बचावले

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : पर्वरी येथील साई सर्विस जवळ रविवारी अटल सेतूवर व्हेंचर गाडीचा ताबा सुटल्याने अपघात झाला. यात आसगाव येथील सामाजिक कार्यकर्ता राजन घाटे यांच्यासह त्याची पत्नी जखमी झाली आहे. त्या दोघांवर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरु आहेत.

ओव्हरटेकिंगच्या नादात अपघात

पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ४.३० वाजता अटल सेतूवर व्हेंचर गाडीचा अपघात झाला. त्यानुसार, पोलिस उपनिरीक्षक प्रतीक भट पथकासह घटनास्थळी धाव पोहोचले. त्याच वेळी या अपघाताची माहिती अग्निशामक दलांना देण्यात आल्यामुळे अग्निशमन अधिकारी दिलीप गावस आपला जवानासह तेही घटनास्थळी दाखल झाले. व्हेंचर गाडीत फसलेल्या चालक राजन घाटे आणि त्याच्या पत्नीला सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर त्यांना लगेच बांबोळी येथील जीएमसीमध्ये दाखल करण्यात आले. ओव्हरटेक करण्याचा नादात गाडीवरचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याचं सांगितलं जातंय.

हात पाय फ्रॅक्चर

या अपघातात चालक राजन घाटे यांचा पाय तर त्यांच्या पत्नीचा हात फ्रकचर झाल्याची माहिती मिळातेय आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार ज्ञानेश्वर नाईक यांनी पंचनामा केला आहे. या अपघातात दोघेजण बालंबाल बचावले आहेत. दरम्यान, हा अपघात इतका भीषण होती की गाडी थेट डिव्हायडर पार करुन पोलवर आदळली. यामध्ये गाडीचंही प्रचंड नुकसान झालंय. पण थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय. दरम्यान, सध्या दोन्हीही जखमींवर उपचार सुरु आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!