अटल सेतूवर टेम्पोचा भीषण अपघात, चालक गंभीररीत्या जखमी

अटल सेतूवर अपघातांची मालिका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये.. महिन्याभरानंतर पुन्हा एकदा अटल सेतूवर अपघात झाला. टेम्पोनं सिमेंट मिक्सरच्या डंपरला मागून धडक दिली. यामध्ये टेम्पो चालक गंभीररीत्या जखमी झालाय. अटल सेतूवरुन जात असताना सिमेंट मिक्सरच्या डंपरनं अचानक ब्रेक मारला.

कसा घडला अपघात?

दरम्यान, मागून भरधाव वेगात टेम्पो येत होता. या टेम्पो चालकाला गाडी कंट्रोल झाली नाही. आणि टेम्पोचालकानं मागून सिमेंट मिक्सरच्या डंपरला जोरदार धडक दिली. यामध्ये टेम्पोचा पुढचा भाग पार चेपलाय. या अपघातत टेम्पोचालकाच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी जीएमसीमध्ये दाखल करण्यात आलंय.

हेही वाचा – ड्रग्सविरोधी मोठी कारवाई! मुंबई NCBचे गोव्यामध्ये छापे

थोडक्यात निभावलं

दरम्यान, टेम्पो चालक या अपघातातून बालंबाल बचावलाय. जीए 07 एफ 5081 या नंबरच्या टेम्पोचं या अपघातात मोठं नुकसान झालंय. या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.

हेही वाचा – धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा…

अपघातानंतर काही काळ अटल सेतूवर वाहतूक कोंडीही झाली होती. मात्र सुदैवाची गोष्ट म्हणजे या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुसऱ्यांदा अटल सेतूवर अपघात झाल्यानं अटल सेतूवरुन जाणाऱ्यांनी गाड्यांनी वेगमर्यादा पाळत काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय.

स्टेफनी लुकासला धमकावणारे भाजपचे कार्यकर्ते?

पाहा अपघाताचे फोटो –

हेही वाचा – भीषण! वास्कोत कारची धडक

भीषण! फूटपाथवर झोपलेल्या ‘त्यांना’ ट्रकने चिरडलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!