ACCIDENT | मालपेनंतर आता कोलवाळ येथे ट्रक कलंडला

गुरुवारी दुपारची घटना; सुदैवाने जिवीतहानी टळली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे निव्वळ मृत्यूचा सापळा बनला आहे. ही गोष्ट रोज उदाहरणांसहित स्पष्ट होतेय. या महामार्गावर अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसतेय. दुचाकी-चारचाकी वाहनांसोबतच आता मोठमोठे ट्रक या महामार्गावर अपघाताचा शिकार होताना दिसत आहेत. या महामार्गावर वाढत्या अपघातांसाठी येथील रस्ते कारणीभूत ठरत आहेत. या महामार्गाची अक्षरशः दुर्दशा झाली आहे. बुधवारी मालपे – पेडणे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठा ट्रक पलटी झाल्याची घटना ताजी असताना गुरुवारी कोलवाळ येथे मोठा ट्रक कलंडला असल्याचं वृत्त हाती येतंय. त्यामुळे येथील स्थानिकांची रस्त्याची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी जोर धरू लागलीये.

हेही वाचाः सिद्धी नाईकची हत्याच झाली? वडिलांची पोलिसात नव्यानं तक्रार

नक्की काय झालं?

मुंबई-गोवा महामार्गाची झालेली दुर्दशा, यामुळे या मार्गावर रोज अपघातांच्या घटना घडू लागल्या आहेत. अशाच गुरुवारी कोलवाळ येथे मोठा अपघात झाल्याचं वृत्त हाती येतंय. कोलवाळ येथे ट्रक कलंडला आहे. कोलवाळ येथील पेट्रोल पंपच्या बरोबर समोर हा ट्रक पलटी झाल्याचं समजतंय. ट्रक नक्की कशामुळे पलटी झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या अपघातात ट्रकचं मोठं नुकसान झालंय.

महाराष्ट्र पासिंगचा ट्रक कलंडला

बुधवारी मालपे येथे झालेल्या अपघातात कर्नाटक पासिंगचा ट्रक, जो महाराष्ट्रातून गोव्यात येत होता, त्याचा अपघात झाला होता. आज कोलवाळ येथे पलटी झालेला ट्रक हा महाराष्ट्र पासिंगचा (एमएच05 एएम-2590) असल्याचं समजतंय. हा ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने इथे काही काळासाठी वाहतूक समस्या निर्माण झाली.

हेही वाचाः VIDEO | कार चालकाचा मृत्यूला वळसा, अपघातातून कसा वाचला जीव

जीवितहानी टळली

या अपघातात सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. अपघात जरी मोठा असला, तर चालक थोडक्यात बचावला असल्याचं समजतंय. मात्र ट्रक एका बाजूने कलंडल्याने ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मात्र खराब रस्त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करतात. या रस्त्याची डागडुजी करण्याची स्थानिक रोज मागणी करत आहेत. मात्र सरकार त्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करत आहे. खराब रस्त्यामुळे प्रवासात अडथळा येतोच. शिवाय ट्रॅफिक जामची समस्येलादेखील प्रवाशांना तोंड द्यावं लागतंय.

हेही वाचाः धक्कादायक! वेबसाईट हॅक करून एकाच कुटुंबातल्या 16 जणांना लस दिल्याचं भासवलं

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले अन् त्यांनी घटनेचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

हा व्हिडिओ पहाः Politics | BJP | माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांचं सूचक वक्तव्य

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!